नमस्कार,
बुलडाणा जिल्हयातल्या घटना व परिस्थीती सर्वांना माहिती असावी. किमान आपण कोठेतरी आपलं म्हणण मांडाव या उददेशाने हया उददेशाने मी लिहीतोय, त्यातल काही भावल काही आवडल तर किमान एक स्क्रॅप कराल एवढीच अपेक्षा !
कालपरवा पासून एका जुन्या माणसाची फार आठवण होते आहे; आपली एक सर्वसामान्य सवय आहे; वाईटाच्या नावाने बोंब मारायची पण चांगल्याच कौतुक करायच नाही. म्हणूनच चांगले काम करणा'या मानसांच नितीधैर्य खचतं !
बुलडाणा जिल्हयात क्रुष्णप्रकाश प्रसाद म्हणून एक एस पी आले होते. मी वैयक्तीक रित्या त्यांना कधी भेटलो नाही. काही बाबतीत वादग्रस्त पण काही बाबतीत खरोखरच प्रशंसनिय काम केल त्या मानसाने ! नेहमी बुलडाण्याला जात असतो पण आता बुलडाण्याला जाणे जाणवत राहते, कारण अधिक्षक क्रुष्णप्रकाश प्रसाद असतांना काळी पिवळी गाडी 8 सवारी घेवून निघत होती; आता 18 सवारी घेवून! त्यावेळी अवैध व्यवसाईकांना भिती व इतरांना आधार वाटत होता. आता मात्र इतरांना भिती व अवैध व्यावसाईकांना आधार असल्यागत वाटत आहे. आज सोनाळयाला गेलो होतो, 20 प्रवासी भरून काळी पिवळी धावत होती; धावतांना काळी पिवळीचा चालक पोलीस व म. रा. प. म. च्या छापामार गाडया कोठे आहेत याची माहिती मोबाईल वर घेत होता; ही माहिती त्याला कोण देत होते माहिती आहे, कोणीतरी कॉंस्टेबल ! त्या कॉंस्टेबलच्याही म्हणे दोन तिन काळया पिवळया आहेत म्हणे !
काळी पिवळीवाले वा अवैध व्यावसाईक धर्माने मुसलमान, हिंदू , बौध्द वा कोणत्याही धर्माचे असतील परंतु पोलीसदादांनी त्यांच्यात एकी निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे. कारण ते बिचारे पोलीसवाले दिसले रे दिसले की एकदुस-याला मोबाईलवरून धोक्याची सुचना देतात. गंमत म्हणजे अवैध प्रवासी वाहतूकीच्या गाडीतून पोलीसदादा ही प्रवास करतात. त्यांना गाडीत जागा दिली की मग 20 सवा-या बिनदिक्कत भरा. काहीच हरकत नाही. मात्र तरीही काळी पिवळी वाले पोलीसदादांना बिगार म्हणून हिनवतात ही गोष्ट वेगळी. असो आता आमच्या जिल्हयात सर्वकाही ऑलबेल आहे. अवैध व्यवसाय निट चालु आहेत हप्ते निट पोहचत आहेत. सणासुदीच्या दिवसात कमाईची व नैवेद्वयाची गरज असल्याने अवैध व्यवसाय तेजीत राहणे आवश्यक असल्याने पोलीस वहीणींची प्रार्थना देव निट कान देवून ऐकत आहेत;
क्रुष्णप्रकाश प्रसाद असतांना जिल्हयात महामंडळाच उत्पन्न वाढल होत. आता मात्र पुन्हा एस टी गाडया अर्ध्या तिकीटाचे प्रवासी व पासधारक घेवून धावत आहेत. एस टी च्या चौकशी खिडकीवर गाडी केंव्हा लागेल विचारल की संबंधित कर्मचारी प्रवाश्याच्या अंगावर वसकन ओरडून लागेल अर्ध्या तासात असे सांगून त्याला अवैध प्रवासी वाहतूकीचा मार्ग दाखवतो आहे. असे करून तो खात असलेल्या मिठाला जागतो आहे. असो देव क्रुष्णप्रकाश प्रसाद यांना उदंड आयुष्य देवो ! कर्तव्यासोबत प्रतारणा करून अनैतिक मार्गाने पैसा कमावणा-या सरकारी नोकरांना असाध्य आजार होवोत, त्यांची मुलबाळ रोगी व अल्पायुषी होवोत. देशाप्रती असलेल्या कर्तव्यासोबत प्रतारणा करणा-याचा निर्वंश होवो; जेणेकरून कधीतरी या देशात सर्वसामान्यांना सुखाने जगता येईल येवढीच प्रार्थना करतो. तुर्तास एवढेच ! यानंतर मात्र अधिक तिखट लिहीण्याचा प्रयत्न करेल.
Friday, September 18, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

Good observation! I am from Akola and we have these issues all over the region. Its time people and MLAs and MPs of the region should come together and bring some good things to Akola, Buldhana and Washim districts. Otherwise we would be negelected forever and all the development in the name of Vidarbha would be concentrated to Nagpur and Amravati only.
ReplyDelete